गुरुदेव दत्त
किसनगिरी बाबा
सूचना : रात्री १० नंतर भक्तनिवास प्रवेश तसेच भोजनालय बंद राहील. | संपर्क - 7796203111 | अधिकृत संकेतस्थळ : gurudevdattapithdevgad.org
|| श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड - सुविधा ||
भक्तनिवास
तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक संत्संगासाठी , चिंता विसरण्यासाठी , जीवनाच्या सार्थकतेचे उत्तर शोधण्यासाठी येतात. अशा भाविकांना सुविधा मिळाल्या की , त्यांच्या वास्तव्यात सुलभता येते.देवगड संस्थान भक्तांचा निवास सुलभ व्हावा , साधनेला पोषक वातावरण लाभावे या भाविकांच्या गरजेला ओळखणारे आहे , भाविकांच्या संख्येत सातत्याने भव्य भक्त निवास या इमारतीची निर्मिती केली आहे.देवगड संस्थान भक्तांचा निवास सुलभ व्हावा , साधनेला पोषक वातावरण लाभावे या भाविकांच्या गरजेला ओळखणारे आहे , भाविकांच्या संख्येत सातत्याने भव्य भक्त निवास या इमारतीची निर्मिती केली आहे.या ठिकाणी एकाच वेळी 1000 भाविकांची राहण्याची सोय होऊ शकेल अशा 75 खोल्यांचे बांधकाम केले. येथे भोजनगृह , स्वागतकक्ष आणि सत्संग कक्षदेखील उपलब्ध आहे. आता देवगडला येऊन ज्यांना सत्संगासाठी , साधनेसाठी थांबावयाचे आहे अशा सगळ्यांसाठी अत्यंत पवित्र , शांत आणि सर्व सुख-सोयींनी युक्त निवासव्यवस्था उपलब्ध आहे. मंदिर परिसराला सन्मुख असणाऱ्या या वास्तुचे नांव आहे ‘भक्त निवास’
यात्री निवास
श्रीक्षेत्र देवगड येथे रोज अनेक यात्रेकरुंच्या गाड्या येतात अशा या यात्रेकरुंना थांबण्यासाठी दोन मोठे यात्री निवास प.पू. बाबांच्या संकल्पनेतून साकार झालेले आहेत. पुरुष व स्त्रियांना वेगवेगळी थांबण्याची व्यवस्था आहे.प्रशस्त असे स्वयंपाकगृह, पिण्याचे शुध्द पाणी,स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादी मुख्य सुविधेने सज्ज असलेले "यात्री निवास" नेहमीच भक्तांच्या सेवेत तत्पर असते.
पाकशाळा
मंदिर परिसरातील भव्य पाकशाळा आपल्या भव्यतेसह स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि आधुनिकतेमुळे लक्ष वेधुन घेते. पूर्णब्रम्ह असणाऱ्. अन्नाची येथे खऱ्या अर्थाने पूजा होते. लक्षावधी भाविकाना प्रसाद वाटणारी हि पाकशाला, अन्नपूर्णेचा पूर्ण आशीर्वाद लाभल्याप्रमाणे भाविकाना निरंतर प्रसादाचा लाभ या पाकशालेतून मिळत असतो. सात्विक अन्नाचा प्रत्यय देणारी हि पाकशाला अप्रत्यक्षरीत्या अन्न सेवनाचे नियमही सांगून जाते. हरी चिंतनासह सेवन केलेल्या अन्नाची चव वेगळी असते याचा प्रत्ययही देते.
रुग्णवाहिका
ईश्वरसेवेला समाजसेवेपर्यंत विस्तारत नेणारे आणि ‘ईश्वरः सर्वभूतानाम’ या शास्त्र वचनानुसार आचरण करुन मानवसेवेला नवे परिमाण देणारे कार्य परमपुज्य भास्करगिरी महाराज करित आहेत . यासाठीच संस्थानने देवगड परीसरातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी आरोग्यसेवा तात्काळ मिळावी याकरीता फ़क्त ५०% शुल्क आकारुन रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली आहे .
ज्ञानसागर
श्री बाबांनी मंदिर परिसराला लागून हिरव्या वनराई च्या कुशीत ज्ञानसागर या भव्यदिव्य वस्तूची निर्मितीही केलेली आहे.वर्षभर येथे कथा, कीर्तन, भाजानाबारोबारच शास्त्रीय संगीताच्या मैफली, ग्रामीण भागेईल शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर, समाज प्रभोधनपर कार्यक्रम ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी शैक्षणिक शिबिर असे व या तऱ्हेचे अनेक कार्यक्रम वर्षभर येथे सुरु असतात. ज्ञानसागर या इमारतीतच सर्व सहभागीना राहता यावे या दृष्टीने संपूर्णपणे सुसज्ज अशी निवास व्यवस्था येथे करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील भक्त व समाजाची सांस्कृतिक व आध्यात्मिक भूक भागविण्याचे काम ज्ञानसागर या इमारतीद्वारे केले जाते, वर्षभर अविरतपणे हि ज्ञानगंगा भक्तांसाठी ओसंडून वाहते.
निवासी मुले
श्री क्षेत्र देवगड संस्थान येथे सर्व समाजांतील व सर्व प्रांतांतील शालेय विद्यार्थी पूर्ण वेळ येथे राहतात. शिक्षणाबरोबरच निवास, भोजन, वैद्यकीय सुविधा या संस्थांच्या वतीने करण्यात येते. या मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा.त्यांना शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षणदेखील मिळावे.हा एक प्रामाणिक प्रयत्न संस्थांच्या वतीने करण्यात येतो.
गोसेवा
श्रीक्षेत्र देवगड हे महाराष्ट्रातील एक आदर्शवत देवस्थान आहे.ज्या देवस्थानचे नाव हे आध्यात्मिक तितकेच सामाजिकदृष्ट्या घेतले जाते.श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे प.पू. किसनगिरी महाराजांच्या आज्ञेने पूजनीय भास्करगिरी महाराजांनी मोठी गोशाळा उभारली. हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गायीस अनन्यसाधारण असे महत्व आहे व हे महत्व जाणूनच श्रीक्षेत्र देवगड संस्थान येथे अतिशय सुंदर, स्वच्छ व नीट नेटक्या गो शाळेची निर्मिती प.पू. बाबांनी केलेली आहे. गायींच्या आरोग्याची काळजी महाराजांच्या देखरेखीखाली घेतली जाते. गायींसाठी मुक्त फिरण्यासाठी जागेची व्यवस्था आहे.