गुरुदेव दत्त
किसनगिरी बाबा
सूचना : रात्री १० नंतर भक्तनिवास प्रवेश तसेच भोजनालय बंद राहील. | संपर्क - 7796203111 | अधिकृत संकेतस्थळ : gurudevdattapithdevgad.org
|| श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड ||
दत्त मंदिर
भूनंदनवन श्रीक्षेत्र देवगड परिसरातील प्रमुख मंदिर म्हणजे श्री दत्तप्रभूंचे मंदिर.
आकर्षक नक्षीकाम , दगडी बांधकाम , संगमरवराचा कल्पक आणि योग्य वापर , चार फूट उंचीचा भव्य सुवर्णकळस आणि सात्विकतेची प्रचीती देणारी रंगसंगती ही या मंदिराची वैशिष्ट्ये.
या सर्व वैशिष्ट्यांना पावित्र्य देणारी श्री दत्तप्रभूंची लोभस मूर्ती या मंदिराचे खरे वैभव आहे. मंदिरात प्रवेश करताच दृष्टीस पडणारी स्वच्छता , पावित्र्य जपण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न आणि संतजनांच्या सहवासाने मंदिर सभागृहाला लाभलेली आध्यात्मिक श्रीमंती या मंदिराच्या आकर्षणाचा महत्वाचा भाग आहे.
हरिनामाच्या गजराने पावन झालेला मंदिराचा प्रत्येक कोपरा जणू या गजरात आपला आवाज मिसळून परमात्म्याला आळवतो आहे असे वाटते.
या मंदिरात दर्शनाचे समाधान , चित्ताला शांती आणि वृत्तीला सात्विकतेचे कोंदण लाभते.
मंदिरात जायचे कशासाठी? या प्रश्नाचे यथार्थ उत्तर घेऊनच भाविक मंदिरास प्रदक्षिणा घालतो. श्री दत्तप्रभूंना डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करतो. हेच या मंदिराचे ऐश्वर्य आहे.
सिध्देश्वर मंदिर
श्रीक्षेत्र देवगड परिसरात श्रीदत्त मंदिराच्या डाव्या बाजूस समर्थ सद्गुरुंच्या इच्छेनुरुप पंचमुखी श्रीसिध्देश्वराचे मंदिर आहे.
या मंदिरात सत्यसंकल्प सिध्दीला नेणाऱ्या श्रीसिध्देश्वराचे, श्रीगणेशाचे, श्रीकार्तिक स्वामींचे आणि माता-पार्वतीचे दर्शन होते.
या देवतांचा मंदिरातील निवास परिसराला समृध्द करतो आणि भाविकांना सांप्रदायिक एकात्मतेचे दर्शनही घडवतो.
अतिशय सुंदर असे हे सिध्देश्वर मंदिर श्री मूर्तींच्या सुबकतेमुळे अधिकच आकर्षक ठरते.
याशिवाय शनि मारुती , नवनाथ मंदिर अशी इतर मंदीरे देखील बघण्यासारखी आहेत.