|| श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड - उत्सव ||
दिंडी क्षेत्र प्रदक्षिणा
दर गुरुवारी आणि दशमीस दिंडी क्षेत्र प्रदक्षिणा.
|
कीर्तन जागर
दर महा शुद्ध एकादशीस कीर्तन जागर द्वादशीस सकाळी क्षेत्र - प्रदक्षिणा आणि महाप्रसाद.
|
श्री दत्तात्रेय जन्म उत्सव
मार्गशीष पौर्णिमा , भगवान श्री दत्तात्रेय जन्म उत्सव , सामुदायिक श्रीगुरुचरित्र पारायण , ज्ञानेश्वरी पारायण. श्री दत्त प्रभूचा जन्म उत्सव या ठिकाणी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडतो. या दिवशी फार मोठी यात्रा भरते. देवगडच्या भव्य प्रांगणात निरनिराळ्या ठिकाणांहून आलेल्या दिंड्यांचे भजनाचे व कीर्तनाचे कार्यक्रम होतात. रात्री महाप्रसाद म्हणून सर्वांना जेवण दिले जाते.
|
महा शिवरात्री महोत्सव
माघ व १३ श्री सिद्धेश्वर - महा शिवरात्री महोत्सव , सामुदायिक श्रीशीवलीलामृत ग्रंथ पारायण , महोत्सव काळ-माघ वद्य. १३ ते माघ व. १४.
|
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पुण्यतिथी महोत्सव
फाल्गुन व. ८ श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पुण्यतिथी महोत्सव , सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण , श्री किसनगिरी विजय ग्रंथ महोत्सव काल फाल्गुन व. ८ ते फाल्गुन व. 12.
|
पालखी सोहळा
श्रीक्षेत्र देवगड ते श्रीक्षेत्र पंढरपूर श्री बाबांचा पालखी सोहळा, पालखी सोहळा काल - जेष्ठ व. ९ ते आषाढ शु. १५ .
|
श्री नाथ पारायण
श्रीनाथ भागवत सप्ताह भाद्रपद शु. १० ते भाद्रपद शु. १५ श्री नाथ पारायण.
|
श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण
त्रैवार्षिक पुरुषोत्तम मास सप्ताह, सामुदायिक श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण, अखंड वीणावादन, नाम जप.
|
व्यासपूजन
गुरुपौर्णिमा (व्यासपूजन ) उत्सव.
|
पौर्णिमा उत्सव
मासिक पौर्णिमा उत्सव
|
कार्तिक पौर्णिमा
त्याच प्रमाणे वर्ष भरात येणारया संतांच्या पुण्यतिथी व जयंती उत्सव साजरे होतात.
|
श्री समर्थ सद्गुरू किसनगिरीबाबा त्रितापपूर्ती समाध
-
|